मुंबई| वार्ताहर 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर या सर्व परिस्थितीमुळे येणारा सातत्यपूर्ण ताण पाहता अखेर केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्राच दाखल करण्यात आल्या आहेत. ज्या सोमवारीच राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू होणार आहेत. 

राज्यात दाखल होत असणाऱ्या या तुकड्यांमध्ये ५ रॅपिड अॅक्शन फोर्स, ३ तुकड्या CISF आणि CRPF च्या २ तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत. 

दाखल करण्यात आलेल्या एका तुकडीत १०० जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रमजान ईद, पालखी सोहळा, गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी या तुकड्यांना राज्यात पाचरण करण्यात आल्या आहेत. राज्यात आलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचा अधिकार त्या - त्या पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राज्यात लष्कराला पाचारण केलं जाईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच फेटाळून लावली होती. पण कोरोनामुळे ताण आल्याने थकलेल्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्याचनुसार निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. ज्या आधारे आता राज्यात आता हे चित्र पाहायला मिळत आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.