मुंबई । वार्ताहर
Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या Lockdown 4.0 ला सुरुवात झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. पण कुठल्या उद्योगांना, दुकानांना आणि व्यवहारांना सुरू करण्याची परवानगी द्यायची याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत असणार हे याधीच स्पष्ट झालेलं असलं, तरी या लॉकडाऊनची नियमावली काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहे. या संवादातून कदाचित नवी नियमावली स्पष्ट होऊ शकते.
Leave a comment