बीड | वार्ताहर

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा  सोमवारी पहाटे मृत्यू झाला. कोरोनामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी म्हटले आहे.

नवी मुंबईतून एकाच कुटुंबातील 7 जण 13 मे रोजी बीड जिल्ह्यात परतले होते. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवाशी असलेले हे कुटूंब वाहन ई-पास काढून आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आल्यानंतर त्यांचे शेतात अलगीकरण करण्यात आले होते.दरम्यान लक्षणे जणू लागल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला माहिती दिली, त्यानंतर सर्वांना आरोग्य पथक पाठवून स्वॅब घेण्यासाठी शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी या सर्वांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली, शिवाय जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 9 वर पोहोचली, असे असतानाच विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांनी यास दुजोरा दिला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.