बीड | वार्ताहर

बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून  २७ जणांचे तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 संशयितांचे असे एकूण २९ स्वॅब रविवारी (दि.17) सकाळी
तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.यातील बीडमधील 20 आणि केजचे 2 असे 22 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे, दरम्यान उर्वरित 7 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. 

मुंबईतून बीड जिल्ह्यात परतलेल्या दोघाचे रिपोर्ट शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान नंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेल्या एकूण निगेटिव्ह रिपोर्टची संख्या 424 झाली आहे. 7 रिपोर्ट प्रलंबित आहेत, एकूण 433 स्वॅब तपासले गेले आहेत, यात दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या गाव परिसरातील माजलगाव, गेवराई व बीड तालुक्यातील एकूण 30 गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. या गावांमध्ये घरोघर नागरिकांचे आरोग्य सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 192 असून 40 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत  46 हजार 775 ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतले आहेत.

कंटेटमेंट झोनमध्ये आरोग्य सर्व्हेक्षण

इटकुर (ता.गेवराई) येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 7 गावांचा समावेश असून त्याची लोकसंख्या 4 हजार 740 असून त्यामध्ये रविवारी एकूण 1 हजार 275 घरांचा  सर्व्हे  करण्यात आला तर हिवरा (ता.माजलगाव) येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 5 गावांचा समावेश असून त्यांची लोकसंख्या 3 हजार 397 असून त्यामध्ये रविवारी एकूण 695 घरांचा सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.