मुंबई | वार्ताहर

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनचा हा ४ था टप्पा उद्यापासून सुरू होणार असून तो ३१ मे पर्यंत असणार आहे. राज्य सरकारने जारी केलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज १७ मे रोजी संपत आहे.

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा लॉकडाऊन वाढवण्याबाबत या आठवड्यात पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. त्यानुसार हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊनचा टप्पा घोषित करण्यात आला. हा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपला, दुसरा लॉकडाऊन १४ एप्रिल ते ३ मे असा होता, तर सध्या सुरू असलेला लॉकडाऊन ३ मे रोजी सुरू झाला असून त्याचा कालावधी १७ मे पर्यंत आहे. १७ मे नंतर लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या.

ज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार म्हणजेच २२ मार्च ते ३१ मे असे ७१ दिवस लॉकडाऊनचे होतात. एवढा काळ राज्याचे अर्थचक्रही थांबले आहे, त्यामुळे राज्याची वाटचाल आर्थिक अडचणीच्या दिशेने सुरू आहे. कोरोनाशी मुकाबला करताना या थांबलेल्या अर्थचक्राला गती देणे गरजेचे असल्याने १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणे गरजेचे आहे.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक बाबतीत शिथिलता दिली जाणार आहे. विशेषतः ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू करण्याबाबत तसंच इतर व्यवहार सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. रेड झोनमध्ये कॅन्टोन्मेंट विभाग सोडून इतर भागातील व्यवहारही कदाचित काही प्रमाणात सुरू होऊ शकतात. याबाबत सरकार लवकरच सविस्तर आदेश जारी करणार आहे. या आदेशात लॉकडाऊनमध्ये किती प्रमाणात आणि कशाला शिथिलता दिली जाईल याबाबत स्पष्टता असेल.

जाणून राज्यात काय राहणार सुरू ?

  • दूध, भाजी, फळ, बेकरी मांस, मासे, अंडी विकणारी दुकानं, साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
  • प्राण्यांचे दवाखाने, पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था, तेल कंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
  • अन्न, औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
  • सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी संख्येसह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. कार्यालयीन ठिकाणी हात धुण्याची सुविधा आणि हँड सॅनिटायझर आवश्यक आहे.
  • औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स, डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील.
  • बँका, एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
  • आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
  • जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
  • शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था
  • काय राहणार बंद?

  • खासगी बस, मेट्रो, लोकल बंदच राहणार आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही, तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे.
  • तसंच खासगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे, पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि दोन व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल.
  • सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. तसेच सामान्य नागरिकही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येऊ शकतात. बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
  • होम क्वारंटाइन असणाऱ्या लोकांना त्याचे नियम पाळावे लागतील. त्यांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. तसेच या व्यक्तींना सरकारी क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात येईल.
  • पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी कायम आहे.
  • अत्यावश्यक सेवा वगळल्यास सगळी दुकानं, ऑफिसेस, कंपन्या, मॅनिफॅक्च्युरिंग युनिट्स बंद राहतील.
  • सगळी प्रार्थनास्थळं सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. पुजाऱ्यांना आतमध्ये पूजा करण्याची किंवा धर्मगुरूंना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असेल.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.