शिरुरकासार । वार्ताहर
तालुक्यातील मानूर चेकपोस्ट वरून अवैधपणे दारू घेऊन जाणार्या एकाला पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या 33 बाटल्यासह दुचाकी (एम.एच.23ए.पी.4058) असा एकुण 41 हजार 716 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील संगमजळगाव येथील सुनील राधाकिसन सदाफुले याने अहमदनगर जिल्ह्यातुन बेकायदेशीरपणे दारू आणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादंवी कलम 188,269,270 भादंवी 51 क्रमांक (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मुंबई दारूबंदी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना.सोमनाथ जायभाये हे करत आहेत. तालुक्यातील आनंदगाव येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणार्या महादेव मुरलीधर विघ्ने याच्याकडून देखील दहा बाटल्या अंदाजे किंमत पाचशे वीस रुपये आणि तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी क्र. (एम.एच.17,बी.एफ.4788) असा एकूण तीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
Leave a comment