नागरिकांची मुख्याधिकारी हजारेंकडे मागळी
धारुर । वार्ताहर
येथील मठ गल्लीत आलेल्या डेंग्यूच्या साथीवर नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांना नागरिकांनी राष्ट्रीय डेंग्यू दिनी चांगलेच धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
शहरातील कसबा विभागात मठ गल्ली गेल्या आठवड्या पासुन डेंग्यू मुळे चर्चेत आहे. या भागात प्रचंड अस्वस्थता असून ठिकठिकाणी गटारी तुंबून पाणी साचलेले दिसुन येते. डेंग्यूच्या साथीनंतर नगर परिषदेने गटारी उपसण्याचे काम सुरु केले. याभागात फवारणी, ड्राय डे, अबेटिंग आदी कामे सुरु केली. मात्र यात सातत्य नसल्याने व नेमके ड्राय डे दिवशीच नळाला पाणी सोडणे, गटारी अर्धवट काढणे, आदी विषयात नागरी तक्रारी वाढल्या. मठ गल्ली शेजारच्या भागात कसल्याही प्रकारची खबरदारी नगर परिषदेने घेतलेली नाही. डेंग्यूची साथ अद्याप आटोक्यात नसल्याने सोशल मेडियात हे प्रकरण चांगलेच चर्चिले जात आहे. या विषयात आज राष्ट्रवादीचे नेते माधव निर्मळ, शिवसेना तालुकाध्यक्ष नारायण कुरुंद, युवानेते सुधीर शिनगारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, राजकुमार शेटे, गणेश सावंत, विजय शिनगारे, खामकर यांच्यासह अनेक नागरिक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात जावून मुख्याधिकारी सुहास हजारे यांना कार्यालयातच घेराव घातला. यावेळी कामे होत नसतील तर प्रभार सोडा नसता तात्काळ कामे करा असा पावित्रा नागरीकांनी घेतला. यावेळी दोन तीन दिवसात संपुर्ण कसबा स्वच्छ करुन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे हजारे यांनी सांगितले.
Leave a comment