बीड । वार्ताहर

 

 

इटकूर आणि हिवरा येथील रुग्णांचा समावेश 

बीड । वार्ताहर

अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं. बीड जिल्ह्यातून शनिवारी (दि 16) नव्याने पाठवलेले 10 पैकी 2 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक इटकुर (ता.गेवराई) तर दुसरा हिवरा बुद्रुक (ता.माजलगाव) येथील आहे. हे दोघे मुंबईतून बीड जिल्ह्यात परतल्याची माहिती समोर आली आहे. मागील दोन महिन्यात आष्टीचा अपवाद वगळता पहिल्यांदाच बीडमध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान अन्य 8 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. 

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 6 तसेच केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 आणि परळी व माजलगावमधून प्रत्येकी 1 स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. सायंकाळी हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी बीडच्या विलगीकरण कक्षात स्वॅब घेतलेल्या 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 8 अहवाल निगेटिव्ह आले. दोघांचे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. हे दोघे रुग्ण जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या संपर्कात किती लोक आले? याबाबत आरोग्य विभागाने माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली असून संबंधित ठिकाणी ‘बी प्लॅन’ तयार केला जावून अधिकच्या उपाययोजना केल्या जावू शकतात. संबंधित रुग्ण मुंबईतून गावी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दुसरीकडे शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकुण 402 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. सध्या परजिल्ह्यातून आलेले 184 जण गृह अलगीकरणात तर 40 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकुण 46 हजार 511 ऊसतोड मजुर जिल्ह्यात परतले आहेत.

विलगीकरण कक्षात उपचार सुरु

शनिवारी बीड जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून एकुण 6 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. यापैकी 4 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले होते, तर उर्वरित 2 जणांचे अहवाल रात्रीपर्यंत प्रलंबित होते. मात्र रात्री 9 वाजता हे अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. ईटकूर आणि हिवरा या गावातील दोघांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान आता या दोन्ही रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. 

विनापास केला मुंबई टू बीड प्रवास 

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मूळगावी पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर अनेक जण ई-पास काढून गावी परतत आहेत. तर काही जण विनापास प्रवास करत आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी बीडमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण न मुंबई परिसरातून बीड जिल्ह्यात दाखल झाले होते. हिवर्‍याचा तरुण 5 मे रोजी तर ईटकूर येथील मुलगी कुटूंबासह 10 मे रोजी जिल्ह्यात परतलेली आहे. त्यांनी विनापास चोरट्या मार्गाने प्रवास करत गावात प्रवेश केला. त्यामुळे त्यांची चेकपोस्टवर नोंद झाली नव्हती. 

बीडकरांनो सावध व्हा; कोरोनाला निमंत्रण देवू नका

आष्टी तालुक्यातील एक रुग्ण जामखेडमध्ये तबलिगींच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना बाधित झाला होता, त्याच्यावर नगर येथे यशस्वी उपचार झाले. नंतर तो कोरोनामुक्त होवून गावी सुखरुप परतला. हा एकमेव अपवाद वगळता बीड जिल्ह्यात मागील दिड महिन्यापासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नव्हता. शिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, गर्दी करु नये, सामाजिक अंतर राखले जावे यासाठी जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. आता पहिल्यांदाच बीड शहरात 2 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून बीडकरांनी अधिक सतर्क होवून विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरातच थांबण्याची गरज आहे. 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.