लॉकडाऊनमध्ये 180 मजुरांच्या हाताला मिळाले काम
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथे ते रोहयोचे योजनेचे काम सुरू करण्यात आले असून येथील कामावर 180 मजूर कार्यरत आहेत .कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात 22 मार्च पासून लॉडाऊन करण्यात आल्यानंतर चौथा लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत राहाणारे असल्याने मजूर कामगारांना काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.म्हणुन मजुरांनी हाताला काम दर्या म्हणून मागणी होत होती.
शासनाने वेळीच दखल घेऊन मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मजूरांन कडून एकमेकांचे सोशल डिस्टन्स सिंग ठेवून काम करण्यात येत आहे . जिरडगाव येथे ता.15 शुक्रवार रोजी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून मजुरांना गटविकास विकास अधिकारी ए.बी गुंजकर यांनी मार्गदर्शन केले कोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले उपस्थित पंचायत समितीचे संतोष पवार महसूल विभागाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी दिलीप हिवाळे सरपंच कविता पाईकराव उपसरपंच सुनील उगले ग्रामविकास रोजगार सेवक दिलीप उढाण यांची यावेळी उपस्थिती होती.
Leave a comment