चांगले कर्तव्य बजावणार्यांना पाच हजारांचे बक्षीस
चेकपोस्टवर एसपींचे स्टिंग ऑपरेशन
बीड । वार्ताहर
गेवराई ठाणे हद्दीतील शहागड-खामगांव चेकपोस्ट डमी प्रवासी यांनी चेकपोस्टवर जिल्ह्यात येण्यासाठी विनंती केल्यावर तेथील पोलीस कर्मचार्याने डमी प्रवाशाकडे पैसे मागितले. या प्रकरणात विनापास प्रवाशी प्रवेश करण्यास मदत केली म्हणून तीन पोलीस कर्मचार्यांना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्वरीत प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे. एसपींच्या या स्टींग ऑपरेशनमुळे आता चेकपोस्टवरील सुरक्षा अधिक कडेकोट होण्यास मदत होणार आहे. पोना. एस.बी.उगले, पोह. एम.के. बहीरवाळ, पोना. डी.बी.गुरसाळे अशी निलंबित कर्मचार्यांची नावे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्हयात बीड पोलीसांकडून जिल्ह्याच्या सिमेवर 23 टिकाणी चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत. त्या चेकपोस्टवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाहेरील जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणारे प्रवासो नागरिकांचे पास व कागदपत्रे यांची पाहणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहे परंतु काही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य करतांना काळजीपुर्वक नागरिकांची विचारपूस व कागदपत्राची पाहणी न करता आपल्या अधिकारात बीड जिल्ह्यात प्रवेश देत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रत्येक चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांची कागदपत्र आणि पासची पाहणी पडताळणी करून जिल्ह्यात प्रवेश देतात का ? याबाबत शहानिशा करण्यासाठी एसपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यात शुक्रवारी (दि.15) दिवसभर व रात्रीही या चेकपोस्टवर खाजगी डमी प्रवासी बाहनासह बाहेर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पाठवून खात्री केली. त्यात शहागड चेकपोस्टवर डमी प्रवाशाकडे जिल्हा प्रवेशासाठी पैसे मागितल्याप्रकरणी तीन पोलीसांना एसपींनी निलंबित केले आहे.
मातोरी,दौलावडगाव चेकपोस्ट जिंकले; कर्मचार्यांना प्रत्येकी 5 हजारांचे बक्षीस
स्टींग ऑपरेशनदरम्यान मातोरी येथील चेकपोस्टच्या ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मातोरी चेकपोस्टवरील कर्मचार्यांनी कोणत्याही अमिषाला बळी ने पडता त्या इसमास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही.या उत्कृष्ट कामगिरीब्दल पोह.डी.एम.राऊत, पोना. डी.एम.डोंगरे, पो.शि.टी.यु. पवळ यांना पोलीस अधीक्षकांकडून प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000 रू व जीएसटी बक्षीस मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अंभोरा ठाणे हद्दीतील दौलावडगांव येथील चेकपोस्टवर डमी प्रवाशाला पाठवण्यात आले. त्याने अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करताना दौलावडगाव चेकपोस्टवरील कर्मचार्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या प्रवाशी व्यक्तीला बीड जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चेकपोस्टवरील पोह. एस.ए.येवले, पोह व्ंही.एस.माळी यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 5 हजार रू. व जीएसटी बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.
महारटाकळीतील तीन पोलीसांना तीन हजारांचा दंड
शुक्रवारी सायंकाळी महारटाकळी येथील चेकपोस्टवर डमी प्रवाशाने चेकपोस्ट ओलांडून शेवगावकडे गेला मात्र चेकपोस्टवरील कर्मचार्यांनी त्यास थांबवलेही नाही,परत 15 मिनिटांनी तीच व्यक्ती बीड जिल्ह्यात येत असतानाही त्याची कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही म्हणून पोना बी.बी.लोहबंदे, पोना.एस.के.लखेवाड, पोना. एस.एस.वाघमारे यांना कर्तव्यात कसुरी केली म्हणून तीन हजार रुपयांच्या रू. दंडाची शिक्षा देण्यात आली.
Leave a comment