पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा मार्ग मोकळा
दिल्ली । वृत्तसेवा
शेजारचा देश म्हणून ओळखले जाणार्या पाकिस्तानचे पाणी बंद करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर केली होती. आता हे पाणी आडवण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तानचे पाणी कधीही रोखले जावू शकते यासंदर्भात केंद्र सरकार कठोर भुमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
गेल्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणारे नदीचे पाणी थांबवण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. शाहपूल कांडीमध्ये रावी नदीवर बंधारा बांधून या निर्णयाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात येणार आहे. णगक प्रकल्पाच्या अंतर्गत जम्मू काश्मीरसाठी या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. तसेच हे पाणी इतर राज्यांमध्ये प्रवाहीत केले जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एका प्रकल्पच्या संशोधन अहवालास केंद्रीय सल्लागार समितीने मंजुरी दिली आहे. याला जम्मू काश्मीरचा ड्रीम प्रोजेक्ट म्हटले जाते. या प्रकल्पामुळे पाण्याचा वापर करुन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. या प्रकल्प पूर्ण करण्यास 9,167 कोटी रुपये खर्च येणार आहे. साधारण 6 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल.
Leave a comment