औरंगाबादकरांनो, आता विनाकारण घराबाहेर पडू नका! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
औरंगाबाद । वार्ताहर
गेल्या महिन्याभरापासून वारंवार आव्हान करूनही औरंगाबादमधील नागरीक प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करत नसल्यामुळे कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील रूग्णसंख्या हजाराच्या घरात पोहचली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यामध्ये प्रशासनाने पुर्णत: अपयश आले आहे. कोरोनाने शहरात आतापर्यंत 25 लोकांचा बळी घेतला आहे. वेगवेगळ्या उपाययोजना करूनही औरंगाबादचे नागरीक स्थानिक पोलीस प्रशासनाला दाद देत नसल्यामुळे राज्य सरकारने औरंगाबाद शहरात जलद कृतीदलाचे पोलीस रस्त्यावर उतरविले आहे. आता या पोलीसांचा खाक्या नागरिकांना कळाल्यानंतर काही काळ का होईना नागरिक घरात बसतील आणि त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यसरकारकडे यासंदर्भात पत्र पाठविले होते.
औरंगाबादमध्ये कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सगळे उपाय प्रशासनाने केले मात्र, ही साखळी खंडित होऊ शकली नाही. आतापर्यंत शहरात 100 टक्के लॉकडाउनचा पर्याय प्रशासन वापरला होता. यामध्ये फक्त दवाखाने आणि औषध विक्रीच सुरू आहे. परंतु, तरीही नागरिकांचा वावर रस्त्यावर दिसतच आहे.
औरंगाबाद शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर लोकांची गर्दी वाढतच चालली आहे. अखेर पोलिसांनीही औरंगाबादकरांपुढे हात टेकले आहे. आता शहराच्या बंदोबस्तात जलद कृती दल रस्त्यावर उतरवले आहे.
शहरातील ज्या भागात कोरोना पोझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्या भागात आज जलद कृती दलाने संचलन केले आहे. आता घराबाहेर विनाकारण कुणी बाहेर आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 872(दुपारी 1 वाजेपर्यंत) पर्यंत पोहचली आहे आणि सायंकाळपर्यंत हा नक्की वाढू शकतो.
औरंगाबादमध्ये सीआरपीएफची एक कंपनी सुद्धा पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या आकडा रोखण्यात यश आले नाही तर औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस ताकद वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Leave a comment