बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज शनिवारी नव्याने 10 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 6 तसेच केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 आणि परळी व माजलगावमधून प्रत्येकी 1 स्वॅबचा समावेश आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
सध्या परजिल्ह्यातून आलेले 150 जण गृह अलगीकरणात तर 40 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 46 हजार 333 ऊसतोड मजूर परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment