बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्रात रक्तसाठा कमी असल्या कारणाने सामाजिक कर्तव्य म्हणून महेश नवमीनिमित्त बीड शहरातील मोरया प्रतिष्ठान व युवा माहेश्वरी, बीड या दोन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मे 2020 पासून सम दिनांकास सकाळी 9 ते 12 या वेळेत जिल्हा रुग्णालय बीड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे र्लेींळव-19 अंतर्गत सामाजिक अंतराच्या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदरील रक्तदान शिबिर पार पडणार आहे. सदरील शिबिरात नोंदणी केल्याशिवाय कोणासही रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी पंकज धुत 9970027700, स्वप्नील देशमुख 8411047373, अमर सारडा 9423168411, मयूर कासट 9420420315, दत्ता गाडे 9975612323, आकाश नहार 9763555750 यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन नगरसेवक अमर नाईकवाडे व पंकज धूत यांनी केले आहे.
Leave a comment