गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील गोविंदवाडी शिवारातून जाणार्या भरधाव ट्रकवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे वाहन चालवणार्या ट्रक चालकाविरुध्द गेवराई ठाण्यात गुरुवारी (दि.14) गुन्हा दाखल झाला.
लता रामेश्वर तोटे असे मयत महिलेचे नाव आहे. बुधवारी पहाटे दिडच्या सुमारास गोविंदवाडी शिवारात ही घटना घडली होती. रामेश्वर तोटे हे त्यांची पत्नी लता तोटे व चुलत भाऊ ऋषीकेश तोटे यांच्यासह कारमधून (क्र. एम.एच.12 के.एन.2690) येत होते. त्यांच्या पुढे चालणारा ट्रक अचानक उजव्या बाजूने वळला. त्यामुळे कार ट्रकवर जावून आदळली.यात लता तोटे यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋषीकेश यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या अपघातप्रकरणी रामेश्वर तोटे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक क्र. (आर.जे.27, जी.ए.7012) च्या चालकाविरुध्द मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पोह. बांगर तपास करत आहेत.
Leave a comment