सर्वच खरेदी केंद्र तात्काळ चालू करा 

दिनकर कदम, गणपत डोईफोडे यांची मागणी

बीड । वार्ताहर

बीड तालुक्यात कापूस खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून नऊ कापूस खरेदी केंद्राला मान्यता असताना फक्त दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. बीड तालुक्यात 6351 शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून या दोन कापूस खरेदी केंद्रावर दररोज केवळ 40 वाहने घेतली जातात हीच पद्धत ठेवली तर शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करायला सहा महिने लागतील आत्तापर्यंत फक्त सहाशे शेतकर्‍यांचाच कापूस खरेदी करण्यात आला आहे उर्वरित सात खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम व उपसभापती गणपत डोईफोडे यांनी केली आहे.

बीड तालुक्यात यंदा कापसाचे चांगले उत्पादन झाले आहे शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यासाठी शासनाकडून अधिकृत नऊ खरेदी केंद्राला मान्यता मिळाली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कापूस खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार 9 केंद्राला मान्यता दिली गेली प्रत्यक्षात मात्र दोनच खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचा कापूस पडून आहे. या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांचा कापूस घेतला जातो त्या खरेदी केंद्रावर अनागोंदी कारभार सुरू आहे शेतकर्‍यांच्या कापसाच्या मापात दहा टक्के कपात करून शेतकर्‍यांचे नुकसान केले जात आहे एका सेंटरवर फक्त वीस वाहने घेतली जातात. त्यातही अनेक शेतकर्‍यांचा कापूस खरेदीसाठी रद्द केला जातो कुठलीही पूर्वसूचना न देता चालू असलेली मापे बंद करण्यात येतात. ग्रेडच्या मनमानी कारभारामुळे आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांचा कापूस पडून आहे तर काही शेतकर्‍यांना कापूस परत घेऊन जावे लागत आहे. ग्रेडर कडून त्रास होत असतानाच जिनिंग चालक देखील कापूस खराब असल्याचे कारण सांगून कुंटल मागे सात ते आठ किलो माप कमी धरतात हा शेतकर्‍यांवर होणारा अन्याय असून 6351इतकी नोंदणी झालेली असताना खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून फक्त 600 शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागेल आणि शेतकर्‍यांचा कापूस पडून राहील शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बीड तालुक्यात मंजूर झालेले सर्वात खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत अशी मागणी बाजार समितीचे सभापती दिनकर कदम व उपसभापती गणपत डोईफोडे यांनी केली आहे.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.