बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून शुक्रवारी (दि.15) सकाळी तपासणीला प्रयोगशाळेत पाठवलेल्या 19 पैकी 17 जणांच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे तर 2 अहवाल प्रलंबित आहेत असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शुक्रवारी सकाळी 10 तसेच अंबाजोगाईच्या स्वाराती विलगीकरण कक्षातून 5 व माजलगाव ग्रामीण रुग्णालयातून 4 अशा एकूण 19 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. सायंकाळी हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी 17 अहवाल निगेटिव्ह आले असून बीड व माजलगाव येथील प्रत्येकी 1 अहवाल प्रलंबित आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आता जिल्ह्यातील एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 394 झाली आहे.
Leave a comment