तलवाडा । शेख अतिख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे मध्यप्रदेशमधील 34 मजुर गेवराई तालुक्यातील तलवाडा व परिसरात अडकले होते. राज्य शासनाने मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नुकतेच या सर्व मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून सुखरुपणे मायदेशाकडे रवाना करण्यात आले.
यावेळी एसटीचे चालक-वाहक व तलवाडा ग्रामस्थांनी मजुरांना प्रेमाचा निरोप दिला. याप्रसंगी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मुकेश कुचरिया, तलवाडा ठाण्याचे निरिक्षक सुरेश उणवणे, आगार प्रमुख वाघदरीकर, पोलीस ठाण्याचे मुंजाळ, पत्रकार शेख अतिख, डॉ. सुरेश गांधले, संजय गालफाडे, पत्रकार अल्ताफ कुरेशी नाटकर, यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व तलवाडा पोलीस ठाण्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment