जिल्ह्यात आजपर्यंत 65 लाखांची दारु जप्त
दारुबंदीच्या 487 गुन्ह्यात 602 आरोपीवंर गुन्हे
बीड । वार्ताहर
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिल्ह्यात आजपर्यंत (दि.15) विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 हजार 28 आरोपींविरुध्द कलम 188 प्रमाणे 859 गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय अवैध दारू विक्रेते,हातभट्टी दारू बनविणार्यांवर एकूण 487 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 602 आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअन्वये गुन्हे दाखल करून तब्बल 64 लाख 84 हजार 289 रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.पोलीसांच्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपाययोजना मधील अधिसूचनांचे उल्लघंन करणाच्यांवर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ठाणेदार यांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेचे उल्लंधन केले म्हणून गुरुवारी (दि.14) जिल्ह्यात 36 आरोपींविरूध्द भादंवि कलम 188 प्रमाणे वेगवेगळे 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 3 हजार 28 आरोपींविरुध्द 859 गुन्हे भादंवि 188 प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हयात अवैध दारू विक्रेते, हातभट्टी दारु बनविणारे आणि दारूच्या अड्डा यांच्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.गुुरुवारी 3 ठिकाणी धाडी टाकून 5 आरोपितांविरुद्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत 73 हजार 500 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Leave a comment