बीड | वार्ताहर

जिल्ह्यातून आज शुक्रवारी (दि.15) सकाळी  आणखी 19 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सायंकाळी अहवाल प्राप्त होऊ शकतात. दरम्यान गुरुवारी पाठवलेले 15 पैकी 14 अहवाल निगेटिव्ह आले असून बीडमधील 1 प्रलंबित अहवाल उद्या शनिवारी मिळेल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शुक्रवारी सकाळी 10 तसेच अंबाजोगाईच्या स्वाराती विलगीकरण कक्षातून 5 व माजलगाव ग्रामीण रुग्णालयातून 4 अशा एकूण 19 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले  आहेत. सायंकाळी हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 377 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान परजिल्ह्यातून आलेले 146 जण गृह अलगीकरणात तर 40 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 46 हजार 296 ऊसतोड मजूर परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.