वडवणी । वार्ताहर
मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमूख सर यांचा वाढदिवसाच्या निमीत्ताने वडवणीचे नगराध्यक्ष पुत्र धनराज मुंडे व पत्रकारांच्या वतीने केक कापुन शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी कोरोना काळात वृत्तपञ व पञकारांपुढे निर्माण होणार्या विविध प्रश्वांवर चर्चा होऊन पञकारांनी स्वतःची काळजी घेऊन काम करावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले.
मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, राज्यातील पञकारांच्या प्रश्नासाठी सतत जागृतपणे काम करणारे एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धनराज राजाभाऊ मुंडे यांनी तालुक्याच्या विविध विषयावर चर्चा केली. यावेळी वडवणी पत्रकारांच्या लेखणीबद्दल विशेष कौतुकही करण्यात आले. पत्रकार हे सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम निस्वार्थपणे करत असतात. आपला जिव धोक्यात घालून बातमी मिळवण्यासाठी बाहेर फिरावे लागत त्यामुळे सत्य वास्तव बातमी लोकांपंर्यत जाते.पत्रकारांना एस.एम. देशमुख यांचे मार्गदर्शन आहे असे ते म्हणाले. वडवणी येथील पञकारांनी एकत्रितपणे देवडी येथे जाऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी धनराज मुंडे, संपादक अनिल वाघमारे, अॅड.विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, सचिव सतिष सोनवणे, कोषाध्यक्ष शांतीनाथ जैन, सुर्यकांत सावंत आदि उपस्थित होते.
Leave a comment