परस्परविरोधी गुन्हे: पाच जणांवर अॅट्रॉसिटी
केज । वार्ताहर
तालुक्यातील बनकरंजा येथे क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन युसूफवडगाव ठाण्यात 11 जणांवर गुन्हा नोंद झाला. यात पाच जणांवर अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.
प्रकाश मधुकर डोंगरे (28, रा. बनकरंजा) यांच्या फिर्यादीनुसार, ‘शेतात शौचास का येतात?’ असे म्हणत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी रमेश आप्पाराव थोरात, गणेश बळीराम थोरात, मंगेश रमेश थोरात, आप्पाराव दगडू थोरात, बापूराव बळीराम थोरात यांच्यावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला. रमेश आप्पाराव थोरात यांनीही फिर्याद दिली. त्यानुसार, ‘तू आम्हाला का अडवलेस?, या कारणावरुन मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला व कुटुंबीयांना विटाने मारहाण केली. प्रकाश मधुकर डोंगरे, सुनील बन्सी डोंगरे, पोपट मधुकर डोंगरे, अनिल बन्सी डोंगरे, मधुकर बापूराव डोंगरे, बन्सी बापूराव डोंगरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment