तुकूचीवाडी शिवारातील घटना;आठ जणांवर गुन्हा

केज । वार्ताहर

शेतातील पिकामध्ये शेळ्या गेल्याच्या कारणावरुन भावकीतील लोकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (दि.13) तालुक्यातील तुकुचीवाडी शिवारात घडली. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही गटातील लोकांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवल्या. केज ठाण्यात  8 जणांवर गुन्हा दाखल झाला.

भागवत चौरे यांच्या तक्रारीवरुन,भुईमुगाच्या शेतात आलेल्या शेळ्या हाकलून दिल्या म्हणून आरोपींनी भागवत यांच्यासह त्यांची आई अनुसया यांना दगड फेकून मारत जखमी करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरुन शंकर चौरे, नारायण चौरे, कमल चौरे, सुनीता चौरे या चौघांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान शंकर चौरे यांनीही तक्रार नोंदवली. आमच्या शेळ्या आरोपींच्या शेतात गेल्या म्हणून दगड मारुन शेळीचा पाय वाकडा केला.‘तुझी शेळी माझ्या शेतात आली कशी’ म्हणत शिवीगाळ करुन शंकर यांच्यासह त्यांची पत्नी, आई-वडिलांनाही दगडाने मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.त्यावरुन बाबासाहेब चौरे, अनिता चौरे, दादासाहेब चौरे, भागवत चौरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हवालदार मुंडे या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.