सिरसाळा । वार्ताहर
परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी (दि.13) उघडकीस आली. या प्रकणी एकावर बलात्कार व अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
आशिष हनुमंत भरडे (22) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीचे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले होते. ती आजीसोबत शेतात राहत होती. सप्टेंबर 2019 पासून सतत चार महिने आशिष भरडे याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यातून पीडितेस गर्भधारणा झाली. कुटुंबीय ऊसतोडीहून परतल्यावर पीडितेने सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर सिरसाळा पोलीस ठाण्यात बलात्कार व अॅट्रॉसिटीप्रमाणे आशिष भरडेवर गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी त्यास अटक केली. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी सांगितले.
---------
Leave a comment