मुंबई । वार्ताहर
देशासह राज्यावर ओढावले कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस आणखीनच गडद होता असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या संरक्षणासाठी कोरोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणारे पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत राज्यतील तब्बल 1001 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या 1001 पोलिसांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 851 जण, उपचारानंतर बरे झालेले 142 जण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या आठ जणांचा समावेश आहे.
त्याचबरोबर लॉकडाउनच्या दरम्यान आपल्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 218 घटना राज्यात घडल्या असून, अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 770 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
देशात कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आपले कोरोना वॉरिअर्स अर्थात पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. आपल्या सुरक्षितेतेसाठी आपला जीव धोक्यात घालून देशभरातील पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. हे पोलीस बांधव देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.
Leave a comment