मुंबई । वार्ताहर
कोरानाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज आढावा बैठक बोलावली. ही बैठक बाळासाहेब ठाकरे सभागृह इथे होणार असून यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदि. नेते असणार आहेत.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉक डाऊन बाबत काय निर्णय घेयचा याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही, अशा भागात बंद असलेले उद्योग व व्यापार सुरु करण्याचा निर्णय होऊ शकतो.
दरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता काही भागातील उद्योग व कारखाने सुरु करण्यास राज्य सरकारने परवागी दिली आहे. 65 हजार उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली असून त्यापैकी 35 हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे 9 लाख कामगार रुजू झाले आहेत. त्यामुळे या संख्येत वाढ करण्याचा दृष्टीने देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच राज्यात कोरोनाने बऱ्यापैकी अनेकजणांना आपल्या कवेत घेतले आहे. मुंबई-पुणे या प्रमुख शहरांनाचं कोरोनाने लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद, मालेगाव- नाशिक, इकडे देखील दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 वर गेली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे या वाढत्या कोरोनाच्या सांसर्गावर नियंत्रण कसे मिळवायचे, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
Leave a comment