बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून बुधवारी पाठवलेले 7 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर आज गुरुवारी (दि.14) सकाळी जिल्ह्यातून आणखी 15 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून गुरुवारी सकाळी 14 तसेच अंबाजोगाईच्या स्वाराती विलगीकरण कक्षातून 1 अशा एकूण 15 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. सायंकाळी हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होतील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. बुधवारपर्यंत पाठवलेले सर्व 363 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
दरम्यान परजिल्ह्यातून आलेले 146 जण गृह अलगीकरणात तर 56 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. काल बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 46 हजार 94 इतके ऊसतोड मजूर परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment