गेवराई । वार्ताहर
पुण्याहून आपल्या वडीगोद्री गावी कारने एक कुटूंब येत होते. गेवराई बायपासवर एका ट्रकला पाठीमागून या कारची जोराची धडक बसल्याने मोठा अपघात झाल्याची घटना मंगळवार दि.12 रोजी रात्रीच्या सुमारास घडली या झालेल्या अपघातात एक महिला जागीच झाली तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
रामेश्वर तोटे हे पत्नी लता टोपे व भावासह पुण्याहून आपल्या गावी वडीगोद्री ता.अंबड जिल्हा जालना येथे इंडिका कारने (एम.एच.12 के.एन.2690) जात होते. ही कार गेवराई शहरातील बायपास रोडवर एका मालवाहू ट्रकला मंगळवार दि 12 रोजी रात्री पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात लता रामेश्वर तोटे (29) या जागीच ठार झाल्या तर रामेश्वर टोपे त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले. या भिषण अपघातात कार चक्काचूर झाली आहे. जखमीना कारमधून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अजय दाभाडे तसेच शिवनाथ परळकर, रंजित होंडे यांनी रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. घटनास्थळी गेवराई पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड यांनी भेट दिली.
Leave a comment