परस्परविरोधी फिर्यादीवरुन 22 जणांवर गुन्हा

धारुर । वार्ताहर

तालुक्यातील चौंडी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन 22 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

बाबासाहेब हरिकिशन सोनवणे (रा. चौंडी) यांच्या फिर्यादीनुसार, ‘चुलत भावासोबतच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी का आलात?’ अशी कुरापत काढून दगड व कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. त्यांचे आई- वडील, पत्नी यांनाही मारहाण करण्यात आली. दशरथ मुंडे, नामदेव मुंडे, सुखदेव मुंडे, चांगदेव मुंडे, जयसिंग मुंडे, राजाभाऊ मुंडे, कृष्णा मुंडे, लक्ष्मण मुंडे, हरिभाऊ मुंडे, रामराज मुंडे, संजय घुगे, गवळण मुंडे, जनाबाई मुंडे, रमेश मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. नामदेव दशरथ मुंडे यांच्या फिर्यादीनुसार, ‘रात्री आमची दुचाकी का फोडली?’ या कारणावरुन त्यांना लोखंडी गजाने मारहाण करुन डोके फोडले. रघुनाथ सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, कौशल्या सोनवणे , रामहरी सोनवणे, हरिकिशन सोनवणे, विलास सोनवणे, मंजुळा सोनवणे, जनाबाई सोनवणे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.