बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून बुधवारी (दि.13) पाठवलेले 7 जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण 363 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून बुधवारी सकाळी 4 तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातून 3 असे एकूण 7 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. सायंकाळी हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले, ते सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.दरम्यान परजिल्ह्यातून आलेले 146 जण गृह अलगीकरणात तर 56 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 46 हजार 94 इतके ऊसतोड मजूर परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली. मंगळवारपर्यंत पाठवलेले सर्व 356 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment