मुंबई  । वार्ताहर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना खुली ऑफर दिली आहे. जर एकनाथ खडसे काँग्रेसचा विचार घ्यायला तयार असतील तर त्यांचं निश्चित स्वागत करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे हे एक समर्थ नेते आहेत. त्यांना मी 1990 सालापासून ओळखतो. नाथाभाऊ म्हणाले की मी त्यांना संपर्क केला होता. ते माझे जुने मित्र आहेत. आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत. खडसे हे जनमानस असलेला नेता आहे. जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन ते आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ऑफर दिल्याचा दावा यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याला आता बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. पण मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभं राहण्यास नकार दिला, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

..तर १०५चे पन्नास व्हायला उशीर लागणार नाही; खडसेंचा गंभीर इशारा

विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.