बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून मंगळवारी पाठवलेले 14 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले असताना आज बुधवारी (दि.13) सकाळी नव्याने 7 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून बुधवारी सकाळी 4 तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातून 3 असे एकूण 7 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होऊ शकतात.दरम्यान मंगळवारपर्यंत पाठवलेले सर्व 356 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment