परळी । वार्ताहर
शहरातील बँक काँलनी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गटनेते वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखाली बोअर घेण्यात आला पाण्याचा प्रश्न मिटला असून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
परळी शहरातील बँक काँलनी परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. वाल्मिक कराड यांनी तात्काळ बोअर देऊन बोअरला भरपूर सहा इंच पाणी लागले असून येथील भागातील पाण्याचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी तात्काळ मिटविल्याबद्दल कैलास फड यांच्यासह आदींच्या उपस्थितीत बोअरचे विधीवत पुजा करण्यात आली.बँक कॉलनी परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी युवानेते कैलास फड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
Leave a comment