बीड । वार्ताहर
मूुदांक विक्रेत्यांनी नेमून दिलेल्या परीसरामध्ये दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे हजर राहून कार्यालयीन वेळेत व रोटेशन पध्दतीने मुद्रांक विक्री व्यवसाय करून पक्षकारांना मुद्रांकाचा तुटवडा होऊ देऊ नये असे निर्देश राहूल रेखावर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, बीड यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये शंभर रुपयाचे मुद्रांक पेपरसाठी जास्तीचे पैशांची मागणी केली जाते. तसेच मनमानी कारभार करतात. अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून सदरील कार्यपद्धती चुकीची असल्याचे दिसून आल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.मूुदांक विक्रेत्यांची उपस्थित राहण्याचे आठवड्यातील दिवसनिहाय रोटेशन पध्दतीने मुद्रांक विक्री करण्यासाठी यादी निश्चित केली आहे. या आदेशानुसार जेवढ्या किंमतीचा मुद्रांक असेल तेवढेच किंमत पक्षकाराकडून घ्यावी. पक्षकारास सौजन्याची वागणूक दयावी. जास्तीचे पैशाची मागणी पक्षकार यांचेकडून करण्यात येवू नये तसेच तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय किंवा जे ठिकाण नेमून दिेले आहे त्याठिकाणी पुढील अटी व शर्तीचे पालन मुद्रांक विक्रेता व पक्षकार यांनी कार्यवाही करावी असे आवाहन केले आहे.
मुद्रांक विक्रेता व पक्षकारांनो, अटी व शर्तीचे पालन करा
आपण नेमून दिलेल्या ठिकाणीच मुद्रांक विक्रेता यांना मुंद्राक विक्री करावा.सदरील ठिकाणी मुद्रांक विक्रेता यांनी सॅनीटायझरच मास्कचा वापर करावा.मुद्रांक विक्रेता यांनी मुद्रांक विकतांना शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार रांगेत उभे करावे त्यामध्ये कमीत कमी तीन ते चार फुटांचे अतंर ठेवावे. यासाठी जमीनीवर मार्किग करावी. रांंग तोडून पक्षकार मुद्रांक घेण्यास आल्यास त्याला मुद्रांक देण्यात येवू नये.स्वतः मुद्रांक विक्रेत्यास ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास इ. लक्षणे असल्यास मुद्रांक विक्री न करता त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा व मुद्रांक विक्री करु नये.
Leave a comment