458 गुन्ह्यात 563 आरोपितांवर गुन्हे
बीड । वार्ताहर
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिल्ह्यात आजपर्यंत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रेते,हातभट्टी दारू बनविणार्यांवर एकूण 458 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 563 आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअन्वये 458 गुन्हे दाखल करून 61 लाख 59 हजार 689 रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपाययोजना मधील अधिसूचनांचे उल्लघंन करणाच्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ठाणेदार यांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्हयात अवैध दारू विक्रेते, हातभट्टी दारु बनविणारे आणि दारूच्या अड्डा यांच्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेचे उल्लंघन केले म्हणून सोमवारी (दि.11) जिल्ह्यात 76 आरोपींविरूद्ध वेगवेगळे 15 गुन्हे भादंवि 188 प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.तसेच लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 2 हजार 826 आरोपींविरुध्द 806 गुन्हे भादंवि 188 प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.
Leave a comment