विधान परिषद निवडणूकीत भाजपात राजकारण रंगले
मुंबई । वार्ताहर
विधान परिषद निवडणूकीमध्ये भाजपाने चार उमेदवार गेल्याच आठवड्यात जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी अचानक डॉ.अजित गोपछडे यांनी माघार घेतली आहे. लातुरचे रमेश कराडांना त्यांच्या जागेवर उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे रमेश कराडांची अचानक लॉटरी लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निवडणूकीमध्ये रमेश कराडांचा अर्ज डमी उमेदवार म्हणून भरला होता.
मागील आठवड्यामध्ये भाजपकडून रंजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे या चार उमेदवारांची विधानपरिषद निवडणुकीसाठी नावे जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे चार अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते.
मात्र काल अचानक भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले यांचे अर्ज दाखल करण्यात आले. याआधी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांपैकी एखादा अर्ज बाद झाला तर अडचण नको त्यामुळे म्हणून खबरदारी म्हणून काल दोन अर्ज भरण्यात आले होते. लेले आणि कराड यांचे अर्ज डमी असतील, आणि या दोघांचे अर्ज मागे घेतले जातील असे काल सांगण्यात आले होते.
Leave a comment