नवी दिल्ली :
देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांना अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आज (मंगळवारी) उपचारानंतर मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि छातीत दुखू लागल्याने 87 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
मनमोहन सिंह यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र चिंता करण्याचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात होतं. उपचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोनाची तपासणी देखील करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2009 मध्ये कोरोनरी बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 14 तास ही शस्त्रक्रीया सुरु होती.
Leave a comment