तलवाडा । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेऊन शासनाच्या प्रत्येक नियमांचे पालन करत असताना तलवाड्यात मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून नियंमाचे उल्लंघन होताना दिसत आहे.
तलवाडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणात व्यवहार असणारे ग्राहक अनेक दिवसांपासून सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आवश्यकतेनुसार पैसे उपलब्ल करण्यासाठी रांगेत उभे राहत असताना त्याकडे दुर्लक्ष करत या शाखेचे वरिष्ठ पदाधिकारी धनदांडग्यांना पैसे देत असल्याच्या तक्रारी नागरिकातून व्यक्त होत आहेत. ‘आम्हाला कळते कुणाला पैसे द्यायचे कुणाला नाही द्यायचे.’ असे उत्तर या बाबतीत विचारणा करणार्या वृतपत्राच्या प्रतिनिधींना बँकेचे अधिकारी उर्मटपणे देतात. बँक प्रशासनाच्या या हेकेखोर वृत्तीतून या ठिकाणी सोशल डिस्टन्सची पायमल्ली होतांना दिसत आहे.
सर्व सामान्य खातेधारकांना दर रोज रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने या ठिकाणी गर्दीत वाढ होऊन सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. याला बँकेचे बँकेचे वरिष्ठ अधिकारी कारणीभुत ठरत आहेत. पोलीस प्रशासनास बँक प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे तलवाडा पोलीसांनी दोन दिवसापूर्वी तलवाडा शाखेच्या सर्व अधिकारी-कर्मचार्यांना समज दिली, मात्र तरीदेखील मुजोर बँक कर्मचार्यांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली होतांना दिसुन येत आहे.
Leave a comment