केज । वार्ताहर

तालुक्यातील ऊसतोड मजुर स्वगृही परतले आहेत.त्यांना 14दिवसासाठी कॉरंटाइन करण्यात आले आहे. ऊन, वारा, वादळ,पाऊस असला तरी सरकारी निर्णयाचे पालन करत ऊसतोड मजुर काटेकोर पणे कॉरंटाइनचे पालन करत आहेत.त्यांच्या जवळचे राशन संपत आले होते. 

शासनाचे राशन अजून मिळाले नाही अशी माहिती समजताच मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,नारायण हांगे यांनी नांदूरघाट,मुंडेवाडी,हांगेवाडी,दरडवाडी या गावातील 100 ऊसतोड मजुरांना व गरजु नागरिकांना राशन,जीवनावश्यक वस्तूचे संच आज वाटप केले.मनसेचे तालुका उपाध्यक्ष गोरख तोगे, मुंडेवाडी चे तरुण नेतृत्व पोपटजी घोळवे,दरडवाडी मनसे शाखा अध्यक्ष डॉ आबा घोळवे, हंगेवादी चे तरुण विजय हांगे,विनोद हांगे,अमोल धनवे,राजेश ऊगलमुगले यांनी उपक्रमाला वेळ देऊन सहकार्य केल्या बद्दल सुमंत धस यांनी या सर्वांचे आभार मानले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.