बीड । वार्ताहर
बीड जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून सोमवारी (दि.11)पाठवलेले 12 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. त्यामुळे आजपर्यंत पाठवलेल्या सर्व निगेटिव्ह रिपोर्टची संख्या 342 झाली आहे.बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून सोमवारी सकाळी 12 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
Leave a comment