माजलगांव । वार्ताहर
आत्मा आणि ईश्वर या दोन्हींमधील अंतर सांधणारा दुवा म्हणजे आई त्या मातेच्या उपकरातुन तिचा प्रजनित आत्मा तसा आयुष्याच्या कुठल्याच पायरीवर उतराई होवु शकत नाही म्हणुन आपल्या कृतार्थ भावना प्रगट करण्यासाठी मानवाने निर्मित केलेला मातादिन माजलगांवच्या गोभक्तांकडुन दिनांक 10 रोजी दोन गोशाळांना ट्रकभर चारा देवून साजरा करण्यात आला.
तसे जन्मदात्री माता आणि गोमाता या दोन्हीही ईश्वराच्या समांतरीत अंश आहेत. सद्याची जागतिक परिस्थिती पाहता सर्वत्र हाहाकार माजलेला असतांना जिथे तिथे मानव आपल्या संवेदनाशुन्यतेचे प्रदर्शन करीत असतांना माजलगांव शहरातील इलेक्ट्रॉनिक्स संघटनेने मात्र मातादिनाचे औचित्य साधुन गोमातेला ट्रकभर चारादेवून जगदजननीच्या प्रती आपल्या कृतार्थ भावना व्यक्त केल्या. तालुक्यातील नागडगांव आणि किट्टी आडगांव या ठिकाणी असलेल्या गोशाळांमधील गाईंसाठी चारा उपलब्ध करुन देण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स संघटनेचे अध्यक्ष शामराव देशमुख यांनी प्रत्यक्ष गोशाळेवर जावुन हा चारा दिला यावेळी त्यांच्या सोबत गोभक्त ताकट, तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, जेष्ठ व्यापारी अनंतदादा रुद्रवार आदी उपस्थित होते.
Leave a comment