परळी । वार्ताहर

वृत्तवाहिनीसाठी काम करणारे वार्ताहर संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आहे. सोमवारी (दि.11)  रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत संभाजी मुंडे यांच्यासह मुलगा विष्णू आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले आहेत.

सोमवारी 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार संभाजी मुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. 7 ते 8 जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात संभाजी मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. प्राणघातक हल्ल्यामागील सूत्रधार कोण? याची माहिती पोलीस घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मागील दोन महिन्यांत परळीत पत्रकारांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.