बीड । वार्ताहर
बीड शहरात लोकनेते जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून मंजुर झालेले 88 कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्याचे काम आता पुन्हा एकदा सुरु झाले आहे. सोमवारी चालु असलेल्या कामाच्या ठिकाणी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी स्वतः जाऊन पाहणी करुन कामाचा आढावा घेतला.
मध्यंतरी काही तांञिक कारणास्तव व कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे ते बंद होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांच्यासोबत जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी आता हे काम सुरु करणे आवश्यक आहे. लॉकडाउन मुळे नागरिक बाहेर येत नाहीत त्यामुळे त्यांनाही आणि कामगारांनाही काम करण्यास अडचणी येणार नाहीत हे, निदर्शनास आणुन दिले या कामास परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर परवानगी मिळल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. सोमवारी चालु असलेल्या कामाच्या ठिकाणी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी स्वतः जाऊन पाहणी करुन कामाचा आढावा घेतला.यावेळी नगरसेवक योगेश क्षीरसागर, भिमराव वाघचौरे, विनोद मुळूक, विलास विधाते, गणेश वाघमारे, मुन्ना गायकवाड उपस्थित होते.
Leave a comment