पंधरा रूग्णांचा मृत्यू
औरंगाबाद । वार्ताहर
गेल्या दोन आठवड्यापासून औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून आतापर्यंत 620 रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 36 तासात तीन जणांचे मृत्यू झाले असून आतापर्यंत 15 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 50 रुग्ण वाढल्यावर सोमवारी सकाळीच तब्बल 61 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 620 झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णात रामनगर 22, एस आरपीएफ जवान 1, सदानंदनगर 8, किलेअर्क 8, न्यायनगर 2, दत्त नगर कैलास नगर 5, भवानी नगर जुना मोंढा 3, पुंडलिक नगर गल्ली 1, एन 4 सिडको, बायजीपुरा, संजयनगर, कैलासनगर, बीड बायपास, कोतवालपुरा, सातारा गाव येथील प्रत्येकी एक व फुलशिवरा गंगापूर येथील 4 रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबादेत 36 तासांत कोरोनामुळे तीन जणांचा बळी गेला आहे. रोषनगेट येथील 50 वर्षीय व्यक्तीचा रविवारी (ता.10) सकाळी आठच्या सुमारास त्यानंतर सोमवारी (ता.11) पहाटे दीडदरम्यान रामनगर, मुकुंदवाडी येथील 80 वर्षीय रुग्ण तर सायंकाळी साडेचारच्या सुमारास 58 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यु झाला. अशी माहिती घाटी रुग्णालयातील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 58 वर्षीय पुरुष रुग्ण (रा.पुंडलिकनगर) यांची कोवीड चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या फुफुसाचा एक भाग क्षयरोगाच्या शस्त्रक्रियेमुळे काढण्यात आला होता. त्यांना मेंदुचा क्षयरोग, हायड्रोकॅफॅलस मानसिक आजार व झटक्याचा आजार होता. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना तिव्र झटके आल्याने तसेच कोवीड-19 या आजाराने दोन्ही फुफुसांच्या न्युमोनियामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण 64 टक्के इतके कमी झाल्यामुळे त्यांना कृत्रीम श्वासोश्वास दिला गेला. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
आतापर्यंत झालेले 14 मृत्यू
5 एप्रिल सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू, 14 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, 18 एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू , 21 एप्रिलला भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू, 22 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू., 27 एप्रिलला किलेअर्क येथील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू, 28 एप्रिलला किलेअर्क येथील 77 वर्षीय महिलेचा मृत्यू, 1 मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू., 2 मे नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू, 3 मे देवळाई येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, 5 मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू., 7 मे आसेफिया कॉलनीतील 95 वर्षीय महिलेचा मृत्यू., 10 मे रोशनगेट येथील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, 11 मे रामनगर, मुकुंदवाडी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Leave a comment