उस्मानाबाद। वार्ताहर
उस्मानाबाद जिल्हा आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील ६ डेपोतून लालापरी रस्त्यावर धावली. त्याबरोबर ८ ते २ वाजेपर्यंत शहरातील दुकाने खुली राहिल्याने नागरिकांची गर्दी दिसून आली. उस्मानाबाद जिल्ह्यात लालपरी धावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दिली होती. जिल्ह्यातून एकूण ६ बस आगारातून ११ फेऱ्या होतील. त्याचबरोबर बसेस च्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच प्रवासी प्रवास करू शकतील. आज सकाळी ९ वाजता कळंब या डेपोतून प्रवाशांसह बस रवाना झाल्यात.
उस्मानाबाद जिल्हा गेल्या अनेक दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये
उस्मानाबाद जिल्हा गेल्या अनेक दिवसापासून ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे कोरोना संशयित किंवा कोरोना पॉझिटिव व्यक्ती नाही. त्यामुळे जिल्ह्यात ११ मेपासून बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली बस सेवा सुरू होण्यासाठी काही अटी देखील घालून दिल्या आहेत. उस्मानाबाद, उमरगा, कळंब, तुळजापूर आणि परांडा या आगारातून प्रत्येकी २ तर भूम आगारातून एका मार्गावर बस निघेल.
असे असेल वेळापत्रक
उस्मानाबाद आगारातून उस्मानाबाद ते उमरगा सकाळी ८ वाजता बस निघेल. तर दुपारी ३ वाजता उमरगा येथून निघेल. उस्मानाबादहून कळंबला जाण्यासाठी उस्मानाबाद कळंब ही बस सकाळी ९ वाजता निघेल. तर ती बस ४ वाजता कळंब येथून उस्मानाबादसाठी परत निघेल. उमरगा आगारातून उमरगा उस्मानाबाद बस सकाळी आठ वाजता निघेल. उमरगा लोहारा सकाळी ९ वाजता निघेल. तर दुपारी ३ वाजता लोहाराहून उमरगासाठी निघेल.
भूम ते उस्मानाबाद जाण्यासाठी अशी असेल बसची वेळ
भूम आगारातून भूम उस्मानाबाद ही बस सकाळी ९ वाजता उस्मानाबाद करीता निघणार आहे. तसेच उस्मानाबादहून भूमला जाण्यासाठी उस्मानाबाद आगारातून ती बस सायंकाळी ५ वाजता निघेल.
तुळजापूर आगाराची अशी असेल वेळ
तुळजापूर आगारातून तुळजापूर उस्मानाबाद ही बस सकाळी ९ वाजता व सायंकाळी ४ वाजता निघेल. तर उस्मानाबाद हुन तुळजापूरला जाण्यासाठी सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता निघेल.
कळंब ते उस्मानाबाद
कळंब आगारातून कळंब उस्मानाबाद ही बस सकाळी ८ वाजता निघून सायंकाळी ५ वाजता उस्मानाबादहुन कळंब साठी निघेल. तर कळंब येरमाळा ही बस सकाळी ९ वाजता निघून सायंकाळी ५ वाजता परतीसाठी निघेल.
परंडा आगाराची वेळ
परांडा आगारातून परांडा भूम उस्मानाबाद ही बस सकाळी ७ वाजता निघून सायंकाळी ४ वाजता उस्मानाबाद परांडासाठी निघेल. तर परांडा पाथरूड बस सकाळी ९ वाजता निघून सायंकाळी ४ वाजता पाथरूड येथून परांड्यासाठी निघेल.
यांना प्रवास करता येणार नाही.
६५ वर्षाखालील व्यक्ती,दुर्धर आजार असलेली व्यक्ती, गरोदर स्त्रिया, १० वर्षाखालील मुले यांना बसमधून प्रवास करता येणार नाही.
जिल्हा अंतर्गत असेल बस सेवा
या सर्व बस जिल्हा अंतर्गत वाहतूक करणार आहेत. जिल्ह्याच्या सीमा बाहेर बस वाहतूक करता येणार नाही. बसचा प्रवासी आसन क्षमतेच्या ५० टक्केच क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असेल.
Leave a comment