मुंबई । वार्ताहर
विधान परिषद निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. काँग्रेसने दोन जागांचा हट्ट सोडल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झालं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.मुख्यमंत्र्यांकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुले उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यात्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने त्यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांकडून त्यास नकार आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने मागणी मंजूर करत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आता येत्या २१ मे रोजी मतदान पार पडणार आहे.
Leave a comment