नवी दिल्ली,
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यांनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री मनमोहन सिंह यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांना कार्डिओ थोरासिक वॉर्डमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या जवळच्या परिचितांनी सांगितले की, घाबरण्याची कोणतीही गरज नाही. मनमोहन सिंह यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाकडून निगरानी ठेवली जात असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छातीत दुखू लागल्यामुळे आज रात्री ८.४५ मिनिटांनी डॉ. मनमोहन सिंह यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे कर्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. नितिश नाईक यांच्या निगरानीखाली मनमोहन सिंह यांच्यावर उपचार केले जात आहे.
दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत डॉ. मनमोहन सिंह यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
Leave a comment