कारवाईत साडेचार लाखांची दारु नष्ट
बीड । वार्ताहर
शहरातील सराफा रोड परिसरातील पात्रुड गल्लीत संचारबंदीदरम्यान सुरु असलेला अवैध हातभट्टी दारुअड्डा उध्वस्थ करण्यात आला. रविवारी (दि.10) सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत साडे चार लाख रुपये किमंतीची 15 हजार हातभट्टी दारु नष्ट करण्यात आली.
पात्रुड गल्लीत हातभट्टी दारु अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली. या ठिकाणी सुमारे 15 हजार लिटर दारू मिळुन आली. त्याची किमंत साडे चार लाख रुपये असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. दरम्यान ही दारु जागीच नष्ट करण्यात आली. तसेच दारू साठवणुकीसाठी वापरले जाणारे पाच हजार रुपये किमंतीचे बँरल जप्त करुन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याशिवाय दारू बनविताना आग लावण्यासाठी वापरला जाणारा कोळसाही जागीच नष्ट केला. या कारवाईत तीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार सर अपर अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक निरीक्षक आंतरप व वीस पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
Leave a comment