गेवराई । वार्ताहर

तालुक्यातील गोदापात्रातुन अवैध वाळु उत्खनन होऊ नये म्हणून महसूल पथक गस्त घालत असतांना हिंगणगाव परिसरासरामध्ये वाळुची लोकेशन करत असलेली  एक पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ जीप ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

शनिवार (दि.9) मध्यरात्रीच्या दरम्यान महसुल पथकाचे नायब तहसिलदार प्रशांत जाधवर, पोलिस उपनिरीक्षक टाकसाळ, तलाठी दादासाहेब शेळके,निकाळजे, विठ्ठल सुतार हे संयुक्तरित्या गोदापात्रात गस्त घालत होते. या दरम्यान अवैध वाळू वाहतुक करणार्‍या गाड्याचे  लोकेशन करणार्‍या पांढर्‍या रंगाची जीप क्र. (एम.एच.28.व्ही.2530) पाळत ठेवत असल्याने सदरिल गाडी ताब्यात घेत शिवाजी चव्हाण व दिपक सटाले या दोघावर गेवराई पोलिस ठाण्यात विविध कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांनी वाळू तस्कारांना सळो की पळो करून सोडले असुन त्यांनी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावल्याने तस्करामध्ये खळबळ उडाली आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.