सिरसाळा । वार्ताहर
सिरसाळा सोनपेठ रस्त्यालगत असणार्या एका ओढ्याच्या कडेला सुरू असणार्या गावठी दारूच्या अड्यावर धाड टाकत सुमारे 1 हजार 500 लिटर रसायन रविवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी नष्ट केले. या प्रकरणी तिघाजनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनपेठ रस्त्यावर सिरसाळा शिवारात असणार्या एका ओढ्याच्या कडेला हातभट्टी काढणी सुरू असल्याची माहिती समजताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,पो.कॉ तुळशीराम परतवाड यांनी कारवाई केली.गावठी दारूने भरलेले बॅरल लाकडी काठीने फोडून त्यातील दिड हजार लिटर दारू उलथून दिली.दारू तयार करणार्यांनी जवळच असणार्या बाजरीच्या पिकांत दारूने भरलेली काही बॅरल लपवून ठेवली होती.ती सुद्धा या पथकाने नष्ट केली. जवळपास 60 हजाराचे रसायन या कारवाईत उध्वस्त करण्यात आले.
Leave a comment